जळगाव (प्रतिनिधी) – तालुक्यातील वावडदे येथील एल.एच.पाटील इंग्लिश मिडीयम स्कूलच्या सीबीएसई स्कूलची दहावीच्या निकालाची सातव्या वर्षीही १०० टक्केनिकालाची परंपरा कायम ठेवली आहे. स्कूलला यावर्षी सर्वच्या सर्व ५० विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले असून सात विद्यार्थी विशेष श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत.
सीबीएसी दहावीच्या निकालात कलश भैय्या ९६ टक्के, प्रतिक तायडे ९४ टक्के, तृप्ती शिंपी ९३ टक्के, मयूर पाटील ९२ टक्के, आशिष गरूड ९१.२ टक्के, ऋषीकेश जोडगण ९१ टक्के, मनिष सुर्यवंशी ९१ टक्के हे विद्यार्थी विशेष श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत. उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचे शाळेचे अध्यक्ष एल.एच.पाटील, जितेंद्र पाटील, उपाध्यक्ष विरेंद्र पाटील, संचालिका वैशाली पाटील, संचालक कुणाल राजपूत, दिव्यानी राजपूत यांनी अभिंदन केले आहे.
विद्यार्थ्यांच्या यशासाठी शाळेच्या मुख्याध्यापिका जयश्री पाटील, वर्गशिक्षक योगेश चव्हाण, दिपक सराफ, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले. गुणवंत विद्यार्थ्यांचे शाळा प्रशासनाने कौतूक करून उज्जवल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्यात.