यावल तालुक्यातील अंजाळे येथील घटना
यावल (प्रतिनिधी) : तालुक्यातील अंजाळे शेत शिवारातून विद्युत कंपनीचे लघू दाबाचे तार चोरी झाले. अज्ञात चोरट्याने दहा गाळ्यावरील सुमारे ४८ हजार रुपये किंमतीचे तार चोरी केले आहे. हा प्रकार निदर्शनास आल्यानंतर यावल पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवण्यात आली.
देविदास दामोदर पाटील यांचे शेत गट क्रमांक १५० पासून ते प्रकाश दामोदर पाटील यांचे शेत गट क्रमांक १५५, राजेंद्र पुरुषोत्तम पाटील यांचे शेत गट क्रमांक १५३, विनायक महाजन यांचे शेत गट क्रमांक २४०/२, साधना चौधरी यांच्या शेत गट क्रमांक २५३, ज्ञानेश्वर चौधरी यांचे शेत गट क्रमांक २३९ व जयंत पाटील यांचे शेत गट क्रमांक ३५०/१ मध्ये विद्युत वितरण कंपनीचे खांब टाकले होते.
या खांबावर लघू दाबाचे तार होते. दहा गाळ्यातील विद्युत वितरण कंपनीचे लघू दाबाचे तार अज्ञात चोरटयांनी चोरी केले. सुमारे ४८ हजार रुपयांचे हे तार चोरी झाले. हा प्रकार शनिवारी दि. ६ जुलै रोजी उघडकीस आला. याबाबत यावल पोलीस ठाण्यात विद्युत वितरण कंपनीचे कर्मचारी भुषण भालेराव यांनी अज्ञात चोरट्यांविरूध्द तक्रार नोंदवली.