यावल (प्रतिनिधी ) – एका आठ वर्षीय बालकावर अनैसर्गिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला असून आरोपीविरुद्ध फैजपूर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तालुक्यातील एका गावात ८ वर्षीय मुलगा राहत असून त्याला १९ जानेवारी रोजी दुपारी १२ ते १२.३० वाजेच्या दरम्यान संशयित आरोपी किरण संतोष तायडे रा. तालुका यावल याने शेतात हरभरा खाण्याचा बहाणा करून नेऊन त्याच्यावर अनैसर्गिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. मुलावर अत्याचार करून संशयित आरोपीने कुणाला सांगू नको असा दम दिला. याप्रकरणी मुलाच्या आजीच्या फिर्यादीवरून फैजपूर पोलीस ठाण्यात संशयित आरोपी किरण तायडे याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोउनि मोहन लोखंडे करीत आहे.