यावल ;– येथील एकात्मिक आदिवासी प्रकल्प कार्यालयांतर्गत, खावटी योजना यावल तालुका ग्रुप अंतर्गत रक्तदान शिबिराचे सोमवारी आयोजन झाले.
शिबिरामध्ये २४ दात्यांनी स्वेच्छेने रक्तदान केले. या ग्रुपच्या माध्यमातून यंदा शंभर टक्के खावटी वितरण करण्यात आले आहे. या ग्रुपने प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर रक्तदान शिबिराचे आयोजन केले. शहरातील विस्तारित भागात आदिवासी मुलांच्या वसतिगृहांमध्ये रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. जिल्हा रुग्णालयाच्या रक्तपेढीकडून रक्त संकलित करण्यात आले. रक्त संकलन अधिकारी डॉ. उमेश कोल्हे, यावल रुग्णालयाचे नानासाहेब घोडके, नीलेश पवार, भरत महाले, महेश पाटील, बापू नेरे, पंकज चौधरी आदींनी रक्त संकलन केले. यशस्वीतेसाठी सहायक प्रकल्प अधिकारी झंपलवाड, खावटी योजना संघटना तालुका सचिव रोहन कोचूरे, कर्मचारी संघटना अध्यक्ष प्रा.प्रशांत बोदवडे, आर. बी. ढोणे, सुनील खराटे, जी. एस. फुकटे, भरत बारी, मोहीत अत्तरदे, उल्हास पाटील, भरत भेंडवाल यांनी परिश्रम घेतले. रक्तदान शिबिराला यावल शहरातील युवकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.








