• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

चाळीसगावच्या यश देशमुखसह दोघां जवानांना वीरमरण

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
November 26, 2020
in जळगाव, भारत, महाराष्ट्र
0

श्रीनगरमध्ये दहशतवाद्यांच्या भ्याड हल्ल्यात शहीद

श्रीनगर/जळगाव (वृत्तसंस्था) – जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांच्या हल्ल्यात दि. २६ नोव्हेंबर रोजी श्रीनगरमध्ये सुरक्षा दलाचे दोन जवान शहीद झाले आहेत. श्रीनगरच्या बाहेर असलेल्या परिम्पुराच्या खुशीपुरात दहशतवाद्यांनी शीघ्र कृती दलाच्या जवानांवर हल्ला केला. यामध्ये दोन जवान गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीनं रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र उपचारांदरम्यान त्यांचा मृत्यू झाला. यात चाळीसगाव तालुक्यातील पिंपळगाव येथील यश दिगंबर देशमुख (वय – २१) यांच्यासह उत्तर प्रदेशातील आणखी एका जवानाला वीरमरण आले आहे.

सध्या सुरक्षा दलांकडून दहशतवाद्यांचा शोध घेण्यासाठी सर्च ऑपरेशन सुरू झाले आहे. पाकिस्तानकडून नियंत्रण रेषेवर सातत्यानं शस्त्रसंधीचं उल्लंघन सुरू आहे. दहशतवाद्यांना नियंत्रण रेषा ओलांडता यावी यासाठी पाकिस्तानी सैन्यानं चालू वर्षात आतापर्यंत ४ हजार १३७ पेक्षा अधिकवेळा शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं आहे. दरम्यान शहिद झालेला जवान यश देशमुख हा मराठा रेजिमेंट १०१ बटालियनचा जवान असल्याची माहिती मिळाली आहे. श्रीनगर येथे सुरक्षेसाठी विविध पॉइंटवर जवान तैनात केले होते. त्यातिल २ पॉइंटवर यश देशमुख आणि उत्तरप्रदेशचा जवान ज्या ठिकाणी कर्तव्य बजावत होते. तेथे अचानक तीन दहशतवादी आले आणि त्यांनी अंदाधुंदी गोळीबार करीत यश आणि सोबतच्या जवानाला गंभीर जखमी केले. यात दोघंही जवानांना वीर मरण आले. तिघ दहशतवाद्यांपैकी दोन पाकिस्तानचे तर एक स्थानिक असल्याची माहिती मिळाली आहे.

यशच्या वीर मरणाची माहिती जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयाला प्राप्त होत असून माहिती घेणे सुरु असल्याचे जिल्हाधिकारी अभिजित राऊत आणि चाळीसगावचे प्रांताधिकारी लक्ष्मीकांत साताळकर यांनी ‘ केसरीराज’ शी बोलतांना सांगितले. यश देशमुखचे पार्थिव शनिवारी २८ रोजी जळगाव जिल्ह्यात येण्याची शक्यता जिल्हाधिकाऱ्यांनी वर्तवली.

यश देशमुखच्या पश्चात आई – वडील, एक भाऊ, दोन बहिणी असा परिवार आहे. यशचा भाऊ पंकज देशमुख हा चाळीसगाव शहरातील महाविद्यालयात अभियांत्रिकीचा डिप्लोमा करीत असून आई-वडील शेती करतात, तर यशच्या दोन बहिणी प्रतीक्षा यांचा विवाह झाला असून दुसऱ्या भगिनी अश्विनी देशमुख या शिक्षण करतात. मागच्यावर्षी प्रशिक्षण पूर्ण करून त्याची यावर्षी सैन्य दलात निवड झाली होती. सुमारे चार महिन्यापूर्वीच त्याला नियुक्ती मिळून श्रीनगर येथे त्याला ड्युटी देण्यात आली होती. त्याला वीरमरण आल्यामुळे गावात शोककळा पसरली आहे.


 

 

Previous Post

शिवाजी नगर येथे नवीन मतदार नोंदणी शिबीर

Next Post

या कालावधीमध्ये संयुक्त सक्रिय कुष्ठरुग्ण व क्षयरुग्ण मोहीम राबविण्यात येणार – डॉ. भीमशंकर जमादार

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

या कालावधीमध्ये संयुक्त सक्रिय कुष्ठरुग्ण व क्षयरुग्ण मोहीम राबविण्यात येणार - डॉ. भीमशंकर जमादार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मामला वीस लाखांच्या खंडणीचा,  भाचाला डांबून ठेवत मामाला पैसे आणण्यासाठी पाठवले जळगावात!
1xbet russia

धक्कादायक : पैसे देण्यास नकार दिल्याने पित्याचा काठीसह बेल्टने झोडपून केला खून !

February 16, 2026
मामला वीस लाखांच्या खंडणीचा,  भाचाला डांबून ठेवत मामाला पैसे आणण्यासाठी पाठवले जळगावात!
1xbet russia

मामला वीस लाखांच्या खंडणीचा,  भाचाला डांबून ठेवत मामाला पैसे आणण्यासाठी पाठवले जळगावात!

February 16, 2026
महिला व बालकल्याण आणि स्थायी समितीच्या माध्यमातून जळगावचा शाश्वत विकास साधणार
1xbet russia

महिला व बालकल्याण आणि स्थायी समितीच्या माध्यमातून जळगावचा शाश्वत विकास साधणार

February 16, 2026
प्लास्टिक विक्रेत्यांना १ मार्चपर्यंत मुदत, त्यानंतर २५ हजारांचा दंड अन् प्रसंगी गुन्हे होणार दाखल !
1xbet russia

प्लास्टिक विक्रेत्यांना १ मार्चपर्यंत मुदत, त्यानंतर २५ हजारांचा दंड अन् प्रसंगी गुन्हे होणार दाखल !

February 16, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

मामला वीस लाखांच्या खंडणीचा,  भाचाला डांबून ठेवत मामाला पैसे आणण्यासाठी पाठवले जळगावात!

धक्कादायक : पैसे देण्यास नकार दिल्याने पित्याचा काठीसह बेल्टने झोडपून केला खून !

February 16, 2026
मामला वीस लाखांच्या खंडणीचा,  भाचाला डांबून ठेवत मामाला पैसे आणण्यासाठी पाठवले जळगावात!

मामला वीस लाखांच्या खंडणीचा,  भाचाला डांबून ठेवत मामाला पैसे आणण्यासाठी पाठवले जळगावात!

February 16, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon