जिल्हा पोलीस दलातर्फे सरदार पटेल यांच्या १५० वी जयंतीनिमीत्त आयोजन
जळगाव (प्रतिनिधी) : जिल्हा पोलीस दलाकडून सरदार वल्लभभाई पटेल यांची १५० वी जयंती निमीत्त ‘वॉक फॉर युनिटी’ या उपक्रमाअंतर्गत ५ कि.मी. चालण्याचे आयोजन दि. २५ रोजी सकाळी ०७ वा. शहर वाहतुक शाखा जळगाव येथे करण्यात आले होते. राष्ट्राच्या ऐक्य, अखंडता आणि बंधुतेचा संदेश देण्यासाठी “वॉक फॉर युनिटी” या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले.

या उपक्रमाचा उद्देश नागरिकांमध्ये राष्ट्रीय एकता, सामाजिक सलोखा आणि सहकार्याची भावना दृढ करणे हा आहे. वॉक फॉर युनिटी या ५ कि.मी. वॉकींग रॅलीला जिल्हाधिकारी रोहन घुगे, पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी हिरवी झेंडी दाखवुन रॅलीची सुरुवात केली. तसेच, प्रत्यक्ष सहभागी झाले. शहर वाहतुक शाखा येथुन रॅलीला सुरुवात होवुन स्वातंत्र्य चौक, आकाशवाणी चौक, काव्यरत्नावली चौक, डी मार्ट पर्यंत व तेथुन परत पोलीस कवायत मैदान असा रॅलीचा मार्ग होता. कार्यक्रमाची सांगता पोलीस कवायत मैदान येथे झाली. पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेडडी यांनी आपल्या भाषणात राष्ट्रपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या एकात्मतेच्या कार्याचा उल्लेख करुन सर्वांना एकतेचा संदेश दिला.
कार्यक्रमात पोलीस अधीकारी/अंमलदार, शहरातील नागरिक, विद्यार्थी, शिक्षक, समाजसेवक आणि विविध क्षेत्रातील मान्यवर सहभागी झाले. तसेच अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, उपविभागीय पोलीस अधीकारी नितीन गणापुरे हे उपस्थित होते. सकाळी ७ वाजता शहर वाहतुक शाखा येथून या वॉकची सुरुवात करण्यात आली. वॉक दरम्यान एकता, शांतता आणि देशभक्तीचा संदेश देण्यात आला. वॉक फॉर युनिटी या कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी पोलीस निरीक्षक संदीप पाटील, मानव संसाधन विभाग, राखीव पोलीस निरीक्षक प्रशांत सुगरवार, सहाय्यक पोलीस निरीक्षक योगीता नारखेडे, राखीव पोलीस उपनिरीक्षक चिवंडे, सर्व कवायत निर्देशक व वेल्फेअर अंमलदार यांनी परिश्रम घेतले.









