• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

व्यापाऱ्याची तब्बल ७७ लाखांची फसवणूक, कर्ज मिळवून देण्याचे आमिष

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
June 8, 2024
in Uncategorized
0

जळगावात ७ जणांवर गुन्हा दाखल

जळगाव (प्रतिनिधी) : दहा कोटी रुपयांचे कर्ज मिळवून देण्याच्या नावाने कर्ज मंजूरीसाठी खोटे ईमेल, खोटी बँक गॅरंटीचे कागदपत्रे ई-मेलवर टाकून ती खरी असल्याचे भासवत त्यापोटी ७७ लाख ८ हजार रुपये वेगवेगळ्या बँक खात्यावर ट्रान्सफर करण्यास सांगून इसमाची फसवणुक केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी बुधवार दि. ५ जून रोजी सायंकाळी ७ वाजता ७ जणांविरुद्ध जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नामदेव पौलाद पाटील (वय ५४, रा. हायवेदर्शन कॉलनी, जळगाव) यांनी फिर्याद दिली आहे. नामदेव पाटील यांची गुरुकृपा इंडस्ट्रीज नावाची कंपनी असून त्याच्या माध्यमातून ते बिल्डरशीप व ऑईल उत्पादक व शेती संदर्भातील व्यवसाय करतात. जून २०२१ मध्ये त्यांचे मित्र रविंद्र आत्माराम सोनवणे यांच्या माध्यमातून त्यांची ताराचंद बेनीवाल यांच्यासह कौशिक भट्टाचार्य रा. कोलकत्ता यांच्यासोबत ओळख झाली. भट्टाचार्य यांनी नामदेव पाटील यांना, मी अधिकृत नॉन बँकींग फायनान्स बँक गॅरंटी काढून देवून त्यावर ग्राहकांना व्यावसायीक कर्ज उपलब्ध करुन देण्याचे काम करतो. त्यापोटी कर्जाच्या ५ टक्के कमिशन घेतो असे सांगितले. नामदेव पाटील यांना व्यवसाय वाढीसाठी कर्जाची गरज असल्याने त्यांनी होकार दिला.

त्यानुसार भट्टाचार्य याने १० कोटी ७५ लाख रुपयांची बँक गॅरंटी मिळवून देईल, त्याचे ९० टक्के रक्कम कर्ज म्हणून देण्याचे निश्चित झाले होते. त्यानुसार नामदेव पाटील यांनी त्यांच्यासह त्यांचा मुलगा आणि पत्नीच्या नावे कर्जासाठी लागणारी कागदपत्रे त्यांच्याकडे दिली. काही महिन्यानंतर १० कोटी ७५ लाख रुपयांची बँक गॅरंटी ईमेलद्वारे त्यांना प्राप्त झाली. त्यावर बँक ऑफ बडोदा येथील बँक मॅनेजरचा सही शिक्का असल्यामुळे त्यांचा प्रकाश निशादराज यांच्यावर विश्वास बसला. वेळोवेळी नामदेव पाटील यांनी आरटीजीएसद्वारे पैसे ट्रान्सफर केले आहेत. त्यावर त्यांनी प्रकाश निशादराज यांना संपर्क करुन कर्जापोटी दिलेली रक्कम परत मिळण्यासाठी तगादा लावला.

परंतू त्यांनी पुन्हा बँक गॅरंटी देण्याचे अमिष दाखवून २८ सप्टेंबर २०२१ ते १ मे २०२३ पर्यंत सुमारे ७७ लाख ८ हजार रुपये उकळले. त्यामुळे नामदेव पाटील यांना आपली फसवणुक झाल्याची खात्री झाली. याप्रकरणी कौशिक भट्टाचार्य रा. कोलकत्ता, ताराचंद बेनिवाल रा. शनिपेठ, प्रकाश निशादराज रा. जिल्हापेठ, रोहीत सिंग रा. जिल्हापेठ यांच्यासह नईम खान, अतुल शर्मा, अभिषेक श्रीवास्तव, आदित्य सिंग या चौघांविरुद्ध जिल्हापेठ पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला आहे.


 

 

Tags: #jalgaon crime news #jalgaon police #maharashtra
Previous Post

झोक्याला फास बसून महिलेचा मृत्यू

Next Post

प्रदीपकुमार कळसकर मानद डॉक्टरेट पदवीने सम्मानित

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
प्रदीपकुमार कळसकर मानद डॉक्टरेट पदवीने सम्मानित

प्रदीपकुमार कळसकर मानद डॉक्टरेट पदवीने सम्मानित

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पांढरा काविळ असलेल्या दोन रुग्णांवर शिबिरातून मोफत मोतीबिंदूची यशस्वी शस्त्रक्रिया
1xbet russia

पांढरा काविळ असलेल्या दोन रुग्णांवर शिबिरातून मोफत मोतीबिंदूची यशस्वी शस्त्रक्रिया

May 4, 2026
अज्ञात वाहनाच्या धडकेत ८७ वर्षीय वृद्धेचा मृत्यू; धडक देऊन चालक फरार
Uncategorized

अज्ञात वाहनाच्या धडकेत ८७ वर्षीय वृद्धेचा मृत्यू; धडक देऊन चालक फरार

May 4, 2026
काळजाचा थरकाप! जामनेरमध्ये स्विमिंग पूलच्या आऊटलेटमध्ये पडून ५ वर्षीय बालकाचा करुण अंत
1xbet russia

काळजाचा थरकाप! जामनेरमध्ये स्विमिंग पूलच्या आऊटलेटमध्ये पडून ५ वर्षीय बालकाचा करुण अंत

May 4, 2026
महावितरणचा गुणवंत तांत्रिक कामगार पुरस्कार सोहळा थाटात
1xbet russia

महावितरणचा गुणवंत तांत्रिक कामगार पुरस्कार सोहळा थाटात

May 3, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

पांढरा काविळ असलेल्या दोन रुग्णांवर शिबिरातून मोफत मोतीबिंदूची यशस्वी शस्त्रक्रिया

पांढरा काविळ असलेल्या दोन रुग्णांवर शिबिरातून मोफत मोतीबिंदूची यशस्वी शस्त्रक्रिया

May 4, 2026
अज्ञात वाहनाच्या धडकेत ८७ वर्षीय वृद्धेचा मृत्यू; धडक देऊन चालक फरार

अज्ञात वाहनाच्या धडकेत ८७ वर्षीय वृद्धेचा मृत्यू; धडक देऊन चालक फरार

May 4, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon