लाखो रुपयांचा ऐवज लंपास ; एमआयडीसी परिसरातील घटना
जळगाव ( प्रतिनिधी )- शहरातील एमआयडीसी परिसरात असणाऱ्या गुरांचा बाजार परिसरात असलेल्या व्यापारी संकुलातील सलग ७ ते ८ दुकानांना टार्गेट करीत लाखो रुपयांचा मुद्देमाल आणि रोकड लांबविल्याचा प्रकार आज सोमवारी सकाळी उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, काशिनाथ लॉज मागे असणाऱ्या एमआयडीसीतील गुरांचा बाजार येथे बी सेक्टर मध्ये सात दुकानांचे शटर उचकटवून अज्ञात चोरट्यांनी दुकानांमधून रोकड आणि मुद्देमाल लंपास केल्याचा प्रकार आज सकाळी उघडकीस आल्यामुळे खळबळ उडाली असून व्यापाऱ्यांमध्ये घबराट निर्माण झाले आहे. दरम्यान घटनेची माहिती कळताच एमआयडीसीचे पोलीस उपविभागीय अधिकारी नितीन गणापुरे, पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांच्यासह पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली.नेमका मुद्देमाल किती गेला आहे, याची माहिती अद्याप समोर आली नसून मात्र लाखो रुपयांची रोकड सह मुद्देमाल चोरटयांनी लांबविल्याचा अंदाज आहे. उशिरापर्यंत एमआयडीसी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु आहे.









