जळगाव ;– सर्वसामान्यांची जाण असणारं व्यक्तिमत्व-आदर्श तलाठी पुरस्कृत निशिकांत माने यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा असून निशिकांत सूर्यकांत माने आदर्श तलाठी म्हणून जिल्हाभरात प्रसिद्द असे नाव आहे. खरं तर शासकीय नोकरदार हा नोकरी आणि घर या त्याच्या विश्वातच रममाण असतो, पण माने आप्पा याला अपवाद आहेत. त्यांचे वडील ही तलाठी आणि सामाजिक कार्यात वाहून घेणारे होते. आपल्या वडिलांचा वारसा चालवत माने अप्पानीही जन सेवेची गाडी पुढे चालवली आहे. आपण जनतेचे सेवक आहोत याची जाण ठेवत शासकीय योजना गोरगरिबांपर्यंत पोहचव त्यांना लाभ मिळवून देणे, जनतेची तत्काळ कामे करणे, योग्य मार्गदर्शन करणे यात माने आप्पा नेहमी आघाडीवर असतात.नोकरी करत ते सामाजिक कार्यातही सदा अग्रेसर आहेत. कोरोना काळात त्यांनी वैयक्तिक खर्च करून गरजू लोकांना किराणा, गहू तांदूळ आणि इतर संसारपयोगी साहित्य उपलब्ध करून दिले होते. अशा कर्तृत्ववान अप्पा यांना २-३वेळा आदर्श तलाठी म्हणून गौरविण्यात आले आहे.








