जळगाव ;- पालकमंत्री ना.गुलाबराव पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त युवासेना शिरसोलीतर्फे आशा वर्कर्स यांना मास्क,सॅनिटायझर ,रजिस्टर व इतर साहित्याचे वाटप आज ५ रोजी करण्यात आले.
विवेकानंद शाळा शिरसोली येथे ,जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री मा.ना.गुलाबराव पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त निमित्त गावात कोरोना रुग्णांची संख्या शून्यावर आली आहे . याचे सर्व श्रेय आरोग्य टीम व दिवस रात्र झटणाऱ्या आशा वर्कर्स यांना जाते. गुलाबराव पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त डॉ.अमोल पाटील,डॉ. यशवंत पाटील,निलेश चौधरी, अनिल महाजन आरोग्यसेवक , यांच्या हस्ते आशा वर्कर्स यांना साहित्यांचे वाटप करण्यात आले.
कार्यक्रमाचे आयोजन विकास पाटील उपजिल्हाप्रमुख युवासेना यांनी केले. याप्रसंगी जावेद पिंजारी ,विजय पाटील, अविनाश पाटील ,नीरज वाणी, अनिल न्हावी ,अनिल धनगर, निलेश भारुडे, गोलू पवार ,बबन धनगर, राहुल धनगर, नाना बारी, जयंत बारी आदींनी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन विजय पाटील यांनी तर आभार विकास पाटील यांनी मानले.