भुसावळ शहरात खडका रोडवर घटना
राजाराम बळीराम राणे (वय ७९ रा. खडका रोड, भुसावळ) हे कुटुंबियांसह वास्तव्याला आहेत. दिनांक ४ ते ८ जून दरम्यान त्यांचे घर बंद असतांना अज्ञात चोरट्यांनी खडकीची आसरी वाकवून आत प्रवेश करत घरातून सोन्याचे दागिने आणि रोकड असा एकुण ५८ हजार रूपये किंमतीचा मुद्देमाल चोरून नेला. हा प्रकार ८ जून रोजी सायंकाळी ७ वाजता समोर आला. यानंतर राजाराम राणे यांनी भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून शनिवारी १४ जून रोजी दुपारी १ वाजता भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ विजय नेरकर हे करीत आहे.