मेहरुण परिसरातील घटना
जळगाव (प्रतिनिधी) : शहरातील मेहरूण परिसरातील कुंभारवाडा येथील ७२ वर्षीय वृध्दाने राहत्या घरात गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी १८ जून रोजी सकाळी ११ वाजता घडली आहे. आत्महत्या करण्याचे कारण समोर आलेले नाही. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
पंडीत रामदास वंजारी (वय ७२ रा. कुंभारवाडा, मेहरूण, जळगाव) असे मयत वृध्दाचे नाव आहे. जळगाव शहरातील मेहरूण परिसरातील कुंभारवाडा परिसरात पंडीत वंजारी हे पत्नी व मुलासह वास्तव्याला आहे. दरम्यान, मंगळवारी १८ जून रोजी सकाळी ११ वाजता घरात कुणीही नसतांना त्यांनी राहत्या घरात गळफास घेवून आत्महत्या केली. आत्महत्या करण्याचे कारण समोर आलेले नाही. ही घटना शेजारी राहणाऱ्यांच्या लक्षात आल्याने त्यांनी तातडीने त्याला शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले.
तपासणी अंती वैद्यकीय अधिकारी डॉ.रेणुका भंगाळे यांनी मयत घोषीत केले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, आणि मुलगी असा परिवार आहे. याबाबत एमआयडीसी पोलीसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.