भुसावळ शहरातील जामनेर रस्त्यावरील घटना
भुसावळ ( प्रतिनिधी ) : – शहरात जामनेर रोडवर जात असलेल्या वृद्धाला जिवे मारण्याची धमकी देत त्यांच्याकडील बॅग हिसकावून चोरट्याने पळ काढल्याची घटना घडली. याप्रकरणी भुसावळ बाजारपेठ पोलिसात गुन्हा दाखल केल्यानंतर दोन तासात पोलिसांनी अटक केली. ही घटना गुरुवारी घडली.
शहरातील जामनेर रोडवरील कृष्णाली हॉटेलजवळून बुढनशाह रमजानशहा छप्परबंद (वय ७७, राईनामुल हसन मशिद, भुसावळ) हे जात होते. संशयित अमर कसोटे (रा. झेडटीसी परिसर, भुसावळ) यांनी त्यांच्या पाठीवर आणि मानेवर चापटा मारत पैसे मागितले. बुढनशाह यांनी विरोध केल्यावर संशयिताने त्यांच्या खांद्यावरील बॅग हिसकावून घेतली. अगर ‘किसी को बताया तो तुझे मार डालूंगा’ अशी धमकी दिली.
यानंतर घटनास्थळावरून पळ काढला. या बॅगेमध्ये एकूण ७ हजार रुपये होते. या घटनेनंतर भुसावळ बाजारपेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात झाला. एपीआय नीलेश गायकवाड यांनी संशयित अमर कसोटे याला झेडटीसी परिसरातून ताब्यात घेत अटक केली.