जळगाव शहरातील दादावाडी येथील घटना
अरुण रामसिंग पाटील (वय-६८, रा. दादावाडी, जळगाव) असे मयत वृद्धाचे नाव आहे. गुरुवारी दिनांक २७ फेब्रुवारी रोजी रात्री १०.३० वाजता त्यांनी राहत्या घरात गळफास घेतला. हा प्रकार नातेवाईकांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी त्यांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी यांनी मयत घोषित केले.
या संदर्भात जळगाव तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. प्राथमिक तपास पोलीस कॉन्स्टेबल अनिल फेगडे करीत आहे.