• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

वृद्ध महिलांना बोलण्यात गुंगवून दागिने लंपास करणाऱ्या महिलेला अटक

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
February 14, 2026
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
भूमिअभिलेख कार्यालयातून तालुक्याचा दस्तऐवज असलेला लॅपटॉप लंपास

अमळनेर पोलीस स्टेशनची कामगिरी

अमळनेर ( प्रतिनिधी ) – वृद्ध महिलांना आपल्या बोलण्यात गुंगवून आणि विविध बतावणी करून त्यांचे दागिने लंपास करणाऱ्या एका भामट्या महिलेला अमळनेर पोलिसांनी शिताफीने अटक केली आहे. अटक करण्यात आलेली महिला चोपडा तालुक्यातील वटार येथील रहिवासी आहे.

सिंधुबाई संतोष चव्हाण (वय ७६, रा. अजंदे, ता. शिंदखेडा) ह्या ३१ जानेवारी रोजी जळगावला जाण्यासाठी दुपारी १२ वाजेच्या सुमारास अमळनेर येथे पोहोचल्या होत्या. त्यावेळी एक अनोळखी महिला त्यांच्याजवळ आली आणि तिने त्यांना जबरदस्तीने फुटाणे खायला दिले. त्यानंतर ती महिला शंभर रुपयांची मागणी करत सिंधुबाईंच्या मागे फिरू लागली. बोलण्यात गुंतवून त्या महिलेने सिंधुबाईंना बसस्थानकाबाहेरील एका मेडिकल स्टोअरवर नेले.

तिथे तिने “तुझी माळ खूप छान आहे, मला फोटो काढण्यासाठी दे” अशी गळ सिंधुबाईंना घातली. विश्वासाने सिंधुबाईंनी आपली सोन्याची माळ तिला दिली. मात्र, फोटो काढण्याच्या बहाण्याने माळ घेऊन गेलेली ती महिला पुन्हा परतलीच नाही. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच सिंधुबाईंनी अमळनेर पोलीस स्टेशन गाठले.गुन्हा दाखल होताच पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांनी तपास पथकाला आरोपीचा शोध घेण्याचे आदेश दिले.

पोलीस उपनिरीक्षक शरद काकळीज, हेडकॉन्स्टेबल मिलिंद सोनार, विनोद संदानशिव आणि निलेश मोरे यांच्या पथकाने तांत्रिक विश्लेषण आणि परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची कसून तपासणी केली. तपासाअंती ही महिला वटार (ता. चोपडा) येथील आशाबाई बाळू तायडे (वय ६३) असल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी १३ फेब्रुवारी रोजी तिला ताब्यात घेऊन अटक केली आहे. या कारवाईमुळे वृद्ध महिलांना लक्ष्य करणाऱ्या टोळीचा किंवा अशा गुन्हेगारांचा पर्दाफाश होण्यास मदत झाली आहे.


 

 

Tags: #amlner crime #jalgaon #maharashtra #bharat
Previous Post

​खान्देशची काशी ‘श्रीक्षेत्र कपिलेश्वर’ महाशिवरात्री उत्सवासाठी सज्ज

Next Post

जळगावात केळी पीक विम्याचा ४४ हजार हेक्टरचा ‘घोटाळा आला समोर

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
जळगावात केळी पीक विम्याचा ४४ हजार हेक्टरचा ‘घोटाळा आला समोर

जळगावात केळी पीक विम्याचा ४४ हजार हेक्टरचा 'घोटाळा आला समोर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जळगावात केळी पीक विम्याचा ४४ हजार हेक्टरचा ‘घोटाळा आला समोर
1xbet russia

जळगावात केळी पीक विम्याचा ४४ हजार हेक्टरचा ‘घोटाळा आला समोर

February 14, 2026
भूमिअभिलेख कार्यालयातून तालुक्याचा दस्तऐवज असलेला लॅपटॉप लंपास
1xbet russia

वृद्ध महिलांना बोलण्यात गुंगवून दागिने लंपास करणाऱ्या महिलेला अटक

February 14, 2026
​खान्देशची काशी ‘श्रीक्षेत्र कपिलेश्वर’ महाशिवरात्री उत्सवासाठी सज्ज
1xbet russia

​खान्देशची काशी ‘श्रीक्षेत्र कपिलेश्वर’ महाशिवरात्री उत्सवासाठी सज्ज

February 14, 2026
जळगाव महापालिका निवडणूक : आरक्षणाला राज्य सरकारची अंतिम मंजुरी
आरोग्य

भटक्या श्वानांसाठी शहरात स्वतंत्र ‘फीडिंग झोन’ निश्चित; नागरिकांना सूचना करण्याचे आवाहन

February 14, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

जळगावात केळी पीक विम्याचा ४४ हजार हेक्टरचा ‘घोटाळा आला समोर

जळगावात केळी पीक विम्याचा ४४ हजार हेक्टरचा ‘घोटाळा आला समोर

February 14, 2026
भूमिअभिलेख कार्यालयातून तालुक्याचा दस्तऐवज असलेला लॅपटॉप लंपास

वृद्ध महिलांना बोलण्यात गुंगवून दागिने लंपास करणाऱ्या महिलेला अटक

February 14, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon