चाळीसगाव ( प्रतिनिधी ) – भजनासाठी गेलेला वयोवृध्द हरविल्याची घटना वाघडू येथे घडली आहे. शहर पोलिसात फिर्याद दाखल करण्यात आली आहे. त्यांच्या मुलाने आता म्हणजे तब्बल २ वर्षांनंतर पोलिसांकडे फिर्याद दाखल केली आहे .
चाळीसगाव तालुक्यातील वाघडू येथील आनंदा गोबजी पाटील (वय-८०) १५ डिसेंबर २०१९ रोजी सकाळी घरच्यांना वेरूळ ( ता. खुलताबाद ) येथे भजनासाठी जाऊन येतो असे सांगून गेला. मात्र तो आजपावेतो घरी परतला नाही. यावर घरच्यांनी वेरूळ परिसरात व नातेवाईकांकडे शोधाशोध केली. परंतु आनंदा गोबजी पाटील हे मिळून आले नाही. दरम्यान मुलगा सुदाम आनंदा पाटील (वय-४८) हा अशिक्षित असल्याने हरवल्याची फिर्याद पोलिसात द्यावी लागते का? हे माहीत नसल्याने आज रोजी त्यांच्या फिर्यादीवरून चाळीसगाव शहर पोलिस स्थानकात हरविल्याची फिर्याद दाखल करण्यात आली आहे. पो नि के. के. पाटील यांच्या निर्देशानुसार पुढील तपास सुरू आहे.