जळगांव (प्रतिनिधी) :- केंद्र सरकारच्या सुचनेनुसार देशभरात ४ मार्च हा दिवस लाईनमन डे म्हणून साजरा करण्यात येतो. याही वर्षी महावितरणच्या जळगांव परिमंडलातील धुळे, नंदुरबार आणि जळगांव मंडलातील सर्व विभागातून लाईनमन डे साजरा करण्यात आला. विविध ठिकाणी झालेल्या कार्यक्रमात विद्युत लाईनमनचा कार्यालयीन प्रमुखांच्या हस्ते सत्कारही करण्यात येऊन त्यांना वीज सुरक्षेबद्दल शपथही देण्यात आली.
जळगाव शहरातून महावितरणच्या वतीने विद्युत सुरक्षेसंदर्भात रॅली काढण्यात आली. रॅलीत सर्व अधिकारी-कर्मचारी मोठया संख्येने सहभागी होते. रॅलीची सांगता परिमंडल कार्यालयाच्या प्रांगणात झाली. जळगाव मंडलातंर्गत असलेल्या लघु प्रशिक्षण सभागृहात मुख्य अभियंता कैलास हुमणे यांच्या अध्यक्षतेखाली समारंभपूर्वक कर्मचाऱ्यांना वीज सुरक्षेची शपथ देण्यात येऊन त्यांचा सन्मान करण्यात आला. कार्यक्रमास सर्व महिला व पुरुष लाईनमन उपस्थित होते. यावेळी अधीक्षक अभियंता अनिल महाजन यांच्यासह सर्व कार्यकारी अभियंते, अधिकारी कर्मचारी मोठया संख्येने उपस्थित होते.