• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

विविध जिल्ह्यात घरफोडी करणारा अट्टल गुन्हेगार जेरबंद

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
January 3, 2026
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
अट्टल चोरट्यास शिताफीने अटक ; अनेक चोऱ्या उघडकीस येण्याची शक्यता

जळगाव एलसीबीला यश

जळगाव (प्रतिनिधी) : जिल्ह्यासह छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर आणि धुळे अशा तब्बल सात जिल्ह्यांमध्ये दिवसा घरफोड्या करून पोलिसांच्या नाकी नऊ आणणाऱ्या एका अट्टल गुन्हेगाराला जेरबंद करण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश आले आहे.

किशोर तेजराव वायाळ (रा. मेरा बु. ता. चिखली, जि. बुलढाणा) असे या सराईत चोरट्याचे नाव असून, त्याच्याकडून १ लाख ९७ हजार रुपये किमतीचे ३५ ग्रॅम सोने जप्त करण्यात आले आहे.गेल्या ३ डिसेंबर २०२५ रोजी पहूर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील तोंडापूर आणि पहूर या गावांमध्ये अज्ञात चोरट्याने भरदिवसा घरफोड्या केल्या होत्या. एकाच दिवशी दोन ठिकाणी झालेल्या या चोरीच्या घटनांमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले होते. याप्रकरणी पहूर पोलीस ठाण्यात दोन स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले होते. घटनेचे गांभीर्य ओळखून पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी स्थानिक गुन्हे शाखा आणि पहूर पोलिसांचे एक संयुक्त विशेष तपास पथक नेमले होते.

तपास पथकाने तांत्रिक माहिती आणि गोपनीय बातमीदारांचे जाळे विणले होते. या तपासात किशोर वायाळ याचे नाव समोर आले. मात्र, हा आरोपी अत्यंत सराईत असून तो कधीही एका ठिकाणी वास्तव्यास राहत नसे. तो सतत आपली ठिकाणे बदलत असल्याने पोलिसांना चकवा देत होता. पथकाने सलग दोन दिवस त्याच्या हालचालींवर लक्ष ठेवले आणि त्याचा मागावर राहून अखेर त्याला शिताफीने ताब्यात घेतले. पोलिसांनी आरोपीची सखोल चौकशी केली असता त्याने पहूरमधील दोन घरफोड्यांसह जामनेर आणि धुळे जिल्ह्यातील सिंदखेडा येथील ३ अशा एकूण ५ मोठ्या घरफोड्यांची कबुली दिली. त्याने चोरलेले सोने संभाजीनगर आणि चिखली परिसरात विकल्याची माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी तातडीने हालचाली करून तो मुद्देमाल हस्तगत केला. या अटकेमुळे अनेक जिल्ह्यांतील घरफोडीच्या गुन्ह्यांची साखळी उघडकीस आली असून, आणखी काही गुन्हे समोर येण्याची शक्यता पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांनी व्यक्त केली आहे.


 

 

Tags: #jalgaon crime news #jalgaon police #maharashtra
Previous Post

ब्रेकिंग : राज्यातील बिनविरोध निवडणुकांची चौकशी होणार !

Next Post

पुणे महानगरपालिकेत नोकरीचे आमिष : अनेकांना तब्बल ७.७९ लाखांचा गंडा !

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
वरणगाव पोलीस स्टेशनला एपीआय जनार्दन खंडेराव यांनी घेतला पदभार

पुणे महानगरपालिकेत नोकरीचे आमिष : अनेकांना तब्बल ७.७९ लाखांचा गंडा !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

गर्जना महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघातर्फे छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुजरा!
Uncategorized

गर्जना महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघातर्फे छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुजरा!

February 19, 2026
डॉ. गुणवंतराव सरोदे आयुर्वेद महाविद्यालयात शिवजयंतीचा जल्लोष
1xbet russia

डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात अवतरली शिवशाही

February 19, 2026
डॉ. उल्हास पाटील फिजिओथेरपी महाविद्यालयात शिवजयंती साजरी
1xbet russia

डॉ. उल्हास पाटील फिजिओथेरपी महाविद्यालयात शिवजयंती साजरी

February 19, 2026
डॉ. गुणवंतराव सरोदे आयुर्वेद महाविद्यालयात शिवजयंतीचा जल्लोष
1xbet russia

डॉ. गुणवंतराव सरोदे आयुर्वेद महाविद्यालयात शिवजयंतीचा जल्लोष

February 19, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

गर्जना महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघातर्फे छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुजरा!

गर्जना महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघातर्फे छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुजरा!

February 19, 2026
डॉ. गुणवंतराव सरोदे आयुर्वेद महाविद्यालयात शिवजयंतीचा जल्लोष

डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात अवतरली शिवशाही

February 19, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon