बेंगळुरू (वृत्तसंस्था) – अभिनेता विवेक ऑबेरॉयच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे. कर्नाटक पोलिसांनी विवेक ऑबेरॉयच्या पत्नीला नोटीस पाठवली आहे. बेंगळुरू सीसीबीने विवेक ऑबेरॉयची पत्नी प्रियांका अल्वा हिला समन धाडले आहेत. ड्रग प्रकरणातील केसमध्ये प्रियांकाला 20 ऑक्टोबर रोजी चौकशीकरता हजर राहण्यासाठी हे समन बजावण्यात आले आहेत. बेंगळुरू सेंट्रल क्राइम ब्रँचने मंगळवारी विवेक ऑबेरॉयच्या घरावर छापा टाकला होता.
आदित्य अल्वा हा सँडलवूड ड्रग केसमधील महत्त्वाचा आरोपी आहे. बेंगळुरू पोलीस गेले महिनाभर आदित्यचा शोध घेत आहेत. सँडलवूड ड्रग प्रकरणातील 12 आरोपींपैकी आदित्य एक आहे. त्याच्या शोधासाठी विवेकच्या घरावर छापे टाकण्यात आले होते. पण त्याचा तिथेही शोध लागलेला नाही. आदित्य अल्वा हा विवेकचा मेहूणा आहे.
आदित्यची बहिण आणि विवेक ऑबेरॉयची पत्नी प्रियांकाला सीसीबीने प्रियांकाला शुक्रवारी चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश दिले होते. पण ती चौकशीकरता उपस्थित न राहिली नाही. त्यामुळे प्रियांकाला प्रियांकाला 20 ऑक्टोबर रोजी बेंगळुरू पोलिसांनी चौकशीकरता उपस्थित राहण्याचे आदेश दिले आहेत. याप्रकरणात काही बड्या सेलिब्रिटींना अटक करण्यात आली आहे. आतापर्यंत अभिनेत्री रागिणी द्विवेदी, संजना गलरानी या अभिनेत्रींना देखील अटक करण्यात आली आहे. बेंगळुरी सीसीबीकडून याप्रकरणाची चौकशी सुरू आहे. अद्याप NCB ने या प्रकरणी चौकशी सुरू केलेली नाही.
आदित्य हा कर्नाटकचे माजी मंत्री जीवराज अल्वा यांचा मुलगा आहे. हाय प्रोफाइल पार्टीमधील तो एक लोकप्रिय चेहरा आहे. प्रकरण उघडकीस आल्यापासून आदित्य गायब आहे. त्याच्याविरोधात लूक आऊट नोटीसही जारी करण्यात आली आहे. तो विवेकच्या घरात असल्याची माहिती बंगळुरू पोलिसांना मिळाली. त्यामुळे बंगळुरू पोलीस मुंबईत आले होते.
दरम्यान विवेक ऑबेरॉयवरून केंद्र आणि महाराष्ट्र सरकार आमने सामने येण्याची शक्यता आहे. ड्रग अँगलचा तपास करणाऱ्या नार्कोटिक्स विभागाने (NCB) अद्याप विवेकला चौकशीसाठी ताब्यात घेतलेलं नाही. त्यामुळे NCB विवेक ओबेरॉयची ड्रग्ज प्रकरणी चौकशी करणार नसेल, तर मुंबई पोलीस ते स्वतंत्रपणे करतील, असा थेट पवित्रा ठाकरे सरकारने घेतला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि गृहमंत्री अनिल देशमुख यांनी पत्रकारांशी बोलताना विवेक ओबेरॉयची चौकशी झालीच पाहिजे, असं स्पष्टपणे सांगितलं आहे.