पारोळा तालुक्यात मोरफळी येथील घटना
ज्योती ज्ञानेश्वर देवरे (माळी, वय ३५) हे त्यांचे मोरफळी शिवारातील शेतातील विहिरीवरून पाणी काढत होते. विहिरीत पाणी जामीनदोस्त असल्यामुळे अंदाज न आल्यामुळे पाय घसरून पाण्यात पडले. ग्रामस्थांना समजताच त्यांनी बाहेर काढण्याचा प्रयत्न केला असता सायंकाळी पाच वाजता पट्टीचे पोहणाऱ्यांनी त्यांचा मृतदेह बाहेर काढला. त्यांना पारोळा कुटीर रुग्णालयात दाखल केले असता डॉ. गणेश पोले यांनी त्यांना तपासुन मयत घोषित केले. पारोळा पोलीस ठाण्यात ज्ञानेश्वर भिका देवरे यांनी खबर दिल्यावरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.