जळगाव तालुक्यातील आव्हाणे येथील घटना
जळगाव (प्रतिनिधी) :- पती कामावर गेलेला असताना घरात एकटीच असलेल्या विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना सोमवार, ५ फेब्रुवारी दुपारी साडेबारा वाजता उघडकीस आली. घराचा दरवाजा उघडाच असल्याने शेजारच्या मंडळींना विवाहितेचा मृतदेह दिसला. त्या वेळी तिच्या पतीला माहिती देत मृतदेह शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात नेण्यात आला. प्रकरणी तालुका पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. .
मनीषा लहू मोरे (२५, रा. आव्हाणे, ता. जळगाव) असे मयत विवाहितेचे नाव आहे. त्यांचे पती लहू मोरे हे पत्नी मनीषा व तीन वर्षीय मुलीसह राहतात. सोमवार, ५ फेब्रुवारी रोजी सकाळी ते कामावर गेले होते. त्या वेळी घरात एकटीच असताना मनीषा मोरे या विवाहितेने अज्ञात कारणास्तव गळफास घेतला. घराचा दरवाजा उघडाच असल्याने दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास शेजारील मंडळींना विवाहिता गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसली.
त्या वेळी त्यांनी तिच्या पतीला घटनेची माहिती कळवली व मृतदेह शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात नेण्यात आला. तेथे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी विवाहितेला मृत घोषित केले. या प्रकरणी तालुका पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.