जळगाव ( प्रतिनिधी ) – गुरूनानक नगरातील विवाहितेचा पैशासाठी पतीकडून मारहाण व छळाचा प्रकार उघडकीला आला शनीपेठ पोलीस ठाण्यात पतीसह सहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सिमा प्रविण शिंदे (वय-३२) यांचा २००८ मध्ये प्रविण सुनिल शिंदे यांच्याशी लग्न झाले. काही दिवस चांगले गेल्यानंतर पती प्रविण शिंदे यांनी विवाहितेला टॉर्चर केले. सासु सुरजबाई शिंदे यांच्या सांगण्यावरून प्रविण शिंदे यांनी विवाहितेला मारहाण केली. माहेरहून सुटकेस भरून पैसे घेवून ये, नाहीतर तुला जिवंत सोडणार नाही अशी धमकी देण्यास सुरूवात केली. सासरे सुनिल शिंदे, जेठ महेंद्र शिंदे, जोगिंदर शिंदे, चुलत जेठ बापु शिंदे (सर्व रा. गुरूनानक नगर ) यांनी शिवीगाळ करत माहेरहून पैसे आणण्यासाठी गांजपाठ केला. छळाला कंटाळून विवाहिता माहेरी निघून आल्या. छळाबाबत पतीसह सहा जणांविरोधात शनीपेठ पोलीसात तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून शनीपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला . पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सुरेश सपकाळे करीत आहे.







