माहिती देणाऱ्याला बक्षीस, नातेवाईकांची माहिती
जळगाव (प्रतिनिधी) :- तालुक्यातील वडनगरी येथे पंडित प्रदीप मिश्रा यांच्या श्री महाशिवपुराण कथा ऐकायला गेलेली विवाहिता बेपत्ता झाल्याची तक्रार जळगाव तालुका पोलीस स्टेशनला देण्यात आली आहे. तर विवाहितेबाबत माहिती देणाऱ्याला योग्य ते बक्षीस देण्यात येईल अशी माहिती नातेवाईकांनी दिली आहे.
प्रीती अमोल चौधरी (वय २४, रा. जामनेर) असे बेपत्ता विवाहितेचे नाव आहे. ती पतीसह जामनेर येथे राहते. प्रीती चौधरी ह्या शिवपुराण कथा ऐकण्यासाठी वडनगरी येथे जाऊन येते म्हणून गेल्या होत्या. मात्र तेथून त्या परतल्याच नाही, म्हणून पतीने पोलीस स्टेशनला धाव घेऊन तक्रार दिली आहे. तपास पोहेकॉ लीलाधर महाजन करीत आहेत. तर दुसरीकडे नातेवाईकांनी देखील विवाहिता बेपत्ता झाल्याची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल केली आहे. तर माहिती देणाऱ्याला योग्य ते बक्षीस दिले जाईल, असे म्हटले आहे.