यावल तालुक्यातील हिंगोणा येथील घटना
यावल (प्रतिनिधी) : तालुक्यातील हिंगोणा येथील ३२ वर्षीय तरुणाने गळफास घेतल्याचा प्रकार शुक्रवारी सायंकाळी निदर्शनास आला. या प्रकरणी फैजपूर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
हिंगोणा येथील माऊली चौकात नीळकंठ वासुदेव ठाकूर (वय ३२) हा तरुण आपल्या कुटुंबासह राहत होता. मयत नीळकंठ ठाकूर यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, २ मुले, भाऊ असा परिवार आहे. या तरुणाने दिनांक ४ ऑक्टोबर रोजी सायंकाळी आपल्या राहत्या घराच्या वरील मजल्यावर गळफास घेतला. हा प्रकार निदर्शनास येताच तातडीने फैजपूर पोलिसांना माहिती देण्यात आली.
फैजपूर पोलीस व नागरिकांनी तातडीने या तरुणाला यावल ग्रामीण रुग्णालयामध्ये दाखल केले. या ठिकाणी डॉक्टरांनी तपासणी करून त्याला मृत घोषित केले. प्रसंगी कुटुंबीयांनी एकाच आक्रोश केला. या प्रकरणी फैजपूर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.