जळगाव (प्रतिनिधी) – मराठा आरक्षणावरील स्थगिती रद्द करण्यात यावी व राज्याच्या घटनात्मक अधिकारांचा वापर करुन मराठा समाजाला सन २०२० -२१ या चालू वर्षांकरिता शिक्षण व शासकीय सेवांमध्ये लाभ मिळण्याबाबत विश्व मराठा संघ यावल तालुक्यातर्फे तहसीलदार यावल यांना निवेदन देण्यात आले.
विश्व मराठा संघ यावल तालुका यांच्या वतीने मराठा आरक्षणावरील स्थगिती रद्द करण्यात यावी व राज्याच्या घटनात्मक अधिकारांचा वापर करुन मराठा समाजाला सन २०२० -२१ या चालू वर्षांकरिता शिक्षण व शासकीय सेवांमध्ये लाभ मिळवा यासाठी तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले. मराठा समाजाचा आरक्षणाचा प्रश्न न्यायालयात प्रलंबित असल्यामुळे आरक्षण लागू होईपर्यंत मराठा समाजाला विविध सवलती आणि योजना लागू कराव्यात, खास करून विद्यार्थ्यांना शैक्षणिक फी सवलत, शिष्यवृत्ती, हॉस्टेलची सुविधा, विशेषतः दुर्गम भागातील मुलांना इतर समाजाप्रमाणे हाॅस्टेलची सुविधा उपलब्ध करून द्यावी. तसेच नामांकित शाळांमध्ये गरीब आणि दुर्गम भागातील मराठा मुलांना खास बाब म्हणून प्रवेश देण्याबाबत सरकारने निर्णय घ्यावा.,असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

यावेळी विश्व मराठा संघ यावल तालुकाध्यक्ष तुषार राजेंद्र पाटील, युवकतालुकाअध्यक्ष प्रतीक ज्ञानेश्वर पाटील, तालुका उपाध्यक्ष गोविंदा गोपाळ पाटील, सामाजिक कार्यकर्ता चंद्रकांत राजेंद्र पाटील फैजपूर, देवेंद्र माधव पाटील, न्हावी, महेश राजेंद्र पाटील कोरपावली आदी उपस्थित होते.







