भडगाव ( प्रतिनिधी ) – अपंग एकात्म शिक्षण योजनाअंतर्गत विशेष शिक्षकांचा रखडलेला पगार त्वरित मिळवण्यासाठी व शिक्षकांचे समायोजन करण्यासाठी- निलेश पाटील (विशेष शिक्षक) यांनी महाराष्ट्र टिचर्स असोसिएशनच्या राज्य अध्यक्षा शुभांगी पाटील यांना निवेदन दिले आहे.
या निवेदनात म्हटले आहे की राज्यातील अपंग एकात्म शिक्षण योजनेतील ७७ विशेष शिक्षकांचे जून २०१९ पासून वेतन मिळालेले नाही या शिक्षकांची माहिती गेल्या महिन्यात शिक्षण संचालनालय कार्यालयाकडे शिक्षण अधिकारी यांच्यामार्फत जमा केली समायोजनाचा प्रस्ताव शिक्षण सचिव यांच्याकडे सादर केला आहे. दोन वर्षाचे वेतन थकीत झाल्याने उदरनिर्वाह व मुलांचे शिक्षण खर्च भागवणे कठीण झाले आहे. या मागण्या निलेश पाटील यांनी शुभांगी पाटील यांच्याकडे केल्या शुभांगी पाटील यांनी निवेदन स्विकारून प्रसंगी शिक्षणमंत्र्यांशी चर्चा करून न्याय देण्याची विनंती करू असे आश्वासन दिले
यावेळी जि प शिवसेना गटनेते मनोहर पाटील, प्रगती विद्यालयाचे मुख्याध्यापक-ब्रिजेश पाटील, राष्ट्रवादी किसान सेल तालुका अध्यक्ष दिपक पाटील, ऍड- विवेक सूर्यवंशी, शरद पाटील, भास्कर पाटील, राजेश पाटील उपस्थित होते.