जळगाव शहरातील गेंदालाल मिल येथील घटना
जळगाव (प्रतिनिधी) :- शहरातील गेंदालाल मिल परिसरात राहणाऱ्या एका ३८ वर्षीय महिलेचा विषारी औषध घेतल्याने उचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना रविवारी ५ जानेवारी रोजी सकाळी ९.३० वाजता घडली आहे. याप्रकरणी जळगाव शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
फरदानबी सलीम खान (वय ३८ रा. गेंदालाल मिल, जळगाव) असे मयत महिलेचे नाव आहे. त्यांच्या पश्चात पती, दोन मुले असा परिवार आहे. शुक्रवारी दि. ३ जानेवारी रोजी सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास फरदानबी ही घरात असतांना त्यांनी विषारी औषध सेवन केले. त्यामुळे त्यांची प्रकृती खालावली. त्यांच्या नातेवाईकांनी त्यांना तातडीने जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. त्यांच्यावर उपचार सुरू असतांना रविवारी ५ जानेवारी रोजी सकाळी साडेनऊ वाजता उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी जळगाव शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोहेकॉ प्रकाश पाटील हे करीत आहे.