रावेर तालुक्यातील विवरे येथील घटना
रावेर (प्रतिनिधी) :- तालुक्यातील विवरे येथील एका ४५ वर्षीय इसमाने विष प्राशन करत आत्महत्या केली आहे. याप्रकरणी निंभोरा पोलीस स्टेशन येथे अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. गावात काही दिवसांपूर्वीच हरणकर दाम्पत्याने आत्महत्या केली होती. त्यामुळे गावात शोकाकुल वातावरण आहे.
योगेश सुधाकर चौधरी (४५) असे मयत इसमाचे नाव आहे. त्याच्या पश्चात दोन मुले, पत्नी, भाऊ असा परिवार आहे. योगेश चौधरी यांच्यावर कर्ज असल्याने ते सातत्याने तणावात राहत होते. त्यांना दारूचेही व्यसन लागले होते. अखेर दि. ६ रोजी त्यांनी विषारी औषध घेऊन आत्महत्या केली.
यामुळे कुटुंबीयांनी एकच आक्रोश केला होता. निंभोरा पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. ग्रामस्थांनी विवरे परिसरात दारूबंदी करण्याची मागणी केली आहे.