पाचोरा तालुक्यातील चिंचपुरे येथील घटना
जळगाव (प्रतिनिधी) : पाचोरा तालुक्यातील चिंचपूरा येथील तरुणाने विषारी औषध घेऊन आत्महत्या करण्याचा दि. २ ऑगस्ट रोजी दुपारी प्रयत्न केला होता. त्याच्यावर उपचार सुरु असताना दि. ५ ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजता मृत्यू झाला आहे. याप्रकरणी रामानंद नगर पोलीस स्टेशनला प्राथमिक अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
आलिफ बुदोदिन तडवी (वय २४, रा. चिंचपूरे ता. पाचोरा) असे मयत तरुणाचे नाव आहे. गावात परिवारासह तो राहत होता. चिंचपुरे गावात त्याने दि. २ ऑगस्ट रोजी दुपारी अडीच वाजता विष प्राशन केले होते. आलीफला कुटुंबीयांनी त्याला उपचारासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. (केसीएन) उपचार सुरु असताना सोमवारी दि. ५ ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजेला उपचार सुरु असताना अलिफचा मृत्यू झाला.
यावेळी कुटुंबीयांनी शोक व्यक्त केला. याप्रकरणी रामानंद नगर पोलीस स्टेशनला प्राथमिक अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.