एरंडोल तालुक्यातील पिंपरी बुद्रुक येथील घटना
एरंडोल (प्रतिनिधी) : तालुक्यातील पिंपरी बुद्रुक येथे शेतात शेतकऱ्याने काहीतरी विषारी द्रव्य सेवन केल्याने त्यांचा मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी दि. २० सप्टेंबर रोजी घडली. याप्रकरणी एरंडोल पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
संजय दौलत पाटील (वय ५५ वर्ष) असे मयत शेतकऱ्याचे नाव आहे. पिंपरी बुद्रुक येथे ते परिवारासह राहत होते. शेतीकाम करून ते परिवाराचा उदरनिर्वाह करीत होते. संजय पाटील हे त्यांच्या शेतात कामाकरता जेवणाचा डबा घेऊन गेले होते. (केसीएन)संध्याकाळपर्यंत ते घरी परत न आल्याने त्यांचा शोध घेण्यात आला असता ते शेतात निंबाच्या झाडाखाली जमिनीवर पडलेले मिळून आले. त्यांनी काहीतरी विषारी द्रव्य घेतल्याचे आढळून आले. त्यांना खाजगी वाहनाने एरंडोल ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले. दरम्यान तपासणी अंती त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. याप्रकरणी एरंडोल पोलीस स्टेशनला सुधाकर धर्मराज पाटील यांनी खबर दिल्यावरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.