रावेर ( प्रतिनिधी ) – खानापूर येथील तरूणाने विषारी औषध घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. आत्महत्या करण्याचे कारण अद्याप अस्पष्ट आहे.
सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, रावेर तालुक्यातील खानापूर येथील गोपाळ बारी (वय-३५) याने रात्री उंदीर मारण्याचे विषारी औषध घेवून आत्महत्या केल्याचे गुरूवार ८ सप्टेंबर रोजी उघडकीला आले. आत्महत्या करण्याचे कारण अद्याप समजू शकले नाही. यासंदर्भात डिगंबर बारी यांच्या माहितीवरून रावेर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.