यावल ( प्रतिनिधी ) – तालुक्यातील विरावली येथील सरपंचाचे घर अतिक्रमणात आहे , उपसरपंचास तीन अपत्ये आहेत , ग्रामपंचायत कारभारात सरपंचांचे सासरे आणि उपसरपंचांचे पतीचा हस्तक्षेप करीत असल्याची तक्रार आज पंचायत समितीच्या गट विकास अधिकाऱ्यांकडे ग्रामस्थांनी दाखल केली आहे

विरावली गावात गतवर्षी निवडून आलेले सरपंच, उपसरपंच व तीन ग्रा प सदस्य यांच्याविरुद्ध अतिक्रमण , उपसरपंच यांचे तीन अपत्य असल्याबाबत तसेच ग्रा.प कारभारात सरपंच यांचे सासरे व उपसरपंच यांचे पती हस्तक्षेप करतात याविषयी तक्रार अर्ज आज राष्ट्रवादी युवक अध्यक्ष तथा ग्रा प सदस्य अॅड. देवकांत पाटील व युवक राष्ट्रवादी तालुका उपाध्यक्ष पवन पाटील यांनी पंचायत समिती येथे दाखल केला.
सरपंच कलीमा तडवी यांचे व सासरे , पती , दीर यांच्या परिवारातील सदस्यांचे राहते घर सरकारी जागेवर अतिक्रमण आहे .उपसरपंच मनीषा पाटील यांचे पती , सासरे व दीर यांचे घर व दुकान अतिक्रमित जागेत आहे. उपसरपंच यांना 2001 नंतर तीन अपत्य आहेत .ग्रा.प सदस्य तुषार पाटील यांचे घर सरकारी जागेवर अतिक्रमण असून नमुना नंबर 8 मध्ये मूळ क्षेत्रफळात बदल केला आहे. शासकीय दस्तवेजमधून पुरावे नष्ट करणे व ग्रा प दस्तऐवजा मध्ये त्यांनी सरपंच यांच्या मदतीने फेरफार केली आहे. ग्रा प सदस्य नथू अडकमोल यांचे सरकारी जागेवर घर व दुकानाचे अतिक्रमण आहे सदस्य इब्राहीम तडवी यांचेदेखील सरकारी जागेवर अतिक्रमण आहे सरपंच यांचे सासरे व उपसरपंच यांचे पती नेहमीच ग्रा.प मासिक मीटिंग व इतर कामात हस्तक्षेप करत असतात. अतिक्रमण , 2001 नंतर तीन अपत्य व ग्रा प कामात कामात हस्तक्षेप याची चौकशी करून कायदेशीर कार्यवाही व्हावी विरावलीच्या सरपंच उपसरपंच व इतर सदस्य यांचे सदस्यत्व रद्द करण्यात अशी मागणी या निवेदनात केली आहे.







