यावल (प्रतिनिधी) – विरावली येथे जिल्हा परिषद शिक्षण व आरोग्य तथा क्रीडा सभापती रवींद्र पाटील यांचे वाढदिवसाचे औचित्य साधत स्मशानभूमीत सौरहायमस्ट लॅम्प बसवण्यात आला .

याप्रसंगी यावल राष्ट्रवादी युवक व छत्रपती फाऊंडेशन अध्यक्ष तथा ग्रा पं सदस्य अॅड. देवकांत पाटील , माजी ग्रा पं सदस्य तथा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुका उपाध्यक्ष पवन पाटील , पीक संरक्षण सोसायटी चेअरमन अर्जुन पाटील, प्रगशील शेतकरी मनीष पाटील ,वि का सो संचालक शरद राजपूत , पीक सरक्षण सोसायटीचे संचालक गोरख पाटील सामाजिक कार्यकर्ते संजू तडवी , वि का सो संचालक गुलाब पाटील, छत्रपती फाऊंडेशन संचालक प्रल्हाद पाटील ,चेतन पाटील , देवेंद्र पाटील आदी उपस्थित होते.
विरावली गावात स्मशानभूमीत रात्री खूप अंधार होत असे त्याठीकाणी लाईटची व्यवस्था नसल्याने अडचणींना सामोरे जावे लागत होते अशा वेळी ट्रॅक्टर किंवा इतर वाहनांच्या उजेडाने अंत्यसंस्कार करण्यात येत होते. काही दिवसापूर्वी सभापती रविंद्र पाटील यांच्याकडे अॅड. देवकांत पाटील, ग्रा.पं. सदस्य शोभा पाटील , शकुंतला पाटील, हमीदा तडवी यांनी ही मागणी केली होती. जि. प. सभापती रवींद्र पाटील यांनी जि. प. सदस्य निधीतुन सौर हायमस्टलॅम्प बसवला अँड. देवकांत पाटील आणि अर्जुन पाटील यांनी नारळ वाढवून हायमास्ट लॅम्पचे लोकार्पण केले.







