जळगाव (प्रतिनिधी) – जळगावतील प्रसिध्द फिजिशियन गोदावरी फाउंडेशनचे मेडीसीन विभागाचे प्राध्यापक डॉ. सुनिल चौधरी व प्रसिध्द दंतरोग तज्ञ डॉ. पुष्पा चौधरी यांचे चिरंजिव डॉ.विपुल चौधरी यांनी डी.एम गॅस्ट्रोइंटरोलॉजी विषयात प्राविण्य मिळवले आहे. त्यांच्या यशाबददल वासुदेव शेनफडू चौधरी, डॉ. एस.जी. चौधरी, बिरबलराम शर्मा, गंभीर पिंजारी यांनी अभिनंदन केले आहे.
डॉ. विपुल यांचे शालेय शिक्षण सेंट जोसेफ हायस्कुल तर ११ वी व १२ वी मुळजी जेठा महाविद्यालयातून पुर्ण केले.सायन्स ऑलंम्पीयाड परिक्षेसाठी जातांना ट्रेनमध्ये एका प्रवाश्याला इजा पोहचल्यावर त्यांनी प्रथोमचार केले होते. समोरच्या सहप्रवाशाने तुला काय बनायचे आहे, असे विचारले असता डॉक्टर व्हायचे सांगीतले. वडील काय करतात असे विचारले. त्यांनी एम डी मेडीसिन असल्याचे उत्तर दिल्यावर तुला मग कॉर्डीओलॉजीस्ट व्हायचे असेल असा प्रतिप्रश्न केल्यावर डॉ . विपुल यांनी, नाही मी गॅस्ट्रोइंटरोलॉजीस्ट होणार असे उत्तर दिले.
ते सहप्रवासी वर्धा कालेजचे तत्कालीन अधिष्ठाता होते. यातूनच त्यांनी लहाणपणापासून या विषयात प्राविण्य मिळवायचे स्वप्न पाहीले होते हे दिसून येते. एम.बी.बी.एस केईएम महाविद्यालयातून स्कॉलरशिपसह पुर्ण केली होती. डी. एम. गॅस्ट्रोइंटरोलॉजी अभ्यासक्रम सायन हॉस्पीटल मधुन उर्त्तीण झाले.
डॉ विपुल यांच्यावर यशाबददल वासुदेव शेनफडू चौधरी, डॉ. एस.जी. चौधरी, बिरबलराम शर्मा, गंभीर पिंजारी यांनी अभिनंदन केले आहे.