जळगाव (प्रतिनिधी) – पाचोरा तालुक्यातील पिंपळगाव हरेश्वर पोलीस ठाण्यात विनयभंगाच्या गुन्ह्याची खोटी तक्रार दाखल करणाऱ्या फिर्यादी महिलेच्या चौकशीची मागणी करणारे निवेदन राष्ट्रवादी किसान सभेचे जिल्हा उपाध्यक्ष सुयश रौंदळे यांनी जिल्हा पोलीस अधीक्षकांना दिले आहे

राष्ट्रवादी किसान सभेचे जिल्हा उपाध्यक्ष सुयश रौंदळे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, पाचोरा तालुक्यातील म्हसास येथील रहिवाशी किसन पाटील हा वादग्रस्त शेती खर्डी आणि विक्रीचे व्यवहार करतो या कामासाठी तो कित्येक लोकांशी विनाकारण वाद घालतो. आपली मुले, भाऊ आणि भाडोत्री गुंडांना सोबत घेऊन लोकांना मारहाणसुद्धा करतो लोहारा येथील सुभाष देशमुख यांनाही शेतीच्या वादातून त्याच्या लोकांनी बेशुद्ध होईपर्यंत मारहाण केली होती. मी त्यांना डॉक्टरकडे घेऊन जाण्यासाठी मदत केली होती, त्यानंतर द्वेषबुद्धीने माझ्यासह माझ्या सहकाऱ्यांवर आणि सुभाष देशमुख यांच्या भावावर किसन पाटील यांची पत्नी वंदना पाटील यांनी खोटी फिर्याद देऊन खोटे गुन्हे दाखल केले आहेत. वंदना पाटील यांनी त्यांच्या फिर्यादीत जी १३ लोकांची नावे दिली आहेत ते लोक त्यादिवशी कथित घटनास्थळी नव्हतेच या फिर्यादीमध्ये जी वेळ नमूद केली आहे. त्यावेळेत मी पाचोऱ्याच्या न्यायालयासमोर माझ्या खाजगी कामासाठी गेलेलो होतो, त्यामुळे फिर्यादी वंदना पाटील आणि वैभव पाटील व किसन पाटील यांची चौकशी करून खोट्या गुन्ह्यात आम्हाला अडकवले असल्याने न्याय द्यावा असे निवेदन पोलीस अधीक्षकांना दिले आहे







