जळगाव ( प्रतिनिधी ) – ‘तू माझी नाही झाली तर तुला कोणाचीच होवू देणार नाही’, असे म्हणत शहरातील तरुणाने विवाहित तरुणीला खोलीत डांबून ठेवत विनयभंग केला एवढेच नाही तर तरुणाने तरुणीच्या कुटुंबियांना जीवे मारण्याची धमकी दिली.
याप्रकरणी २० मे रोजी जळगाव तालुका पोलिस ठाण्यात निखिल सोनवणे (रा. अहुजा नगर निमखेडी जळगाव) याच्याविरुद्ध विनयभंगासह इतर कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जळगाव शहरातील एका भागातील तरुणी १२ मेरोजी दुपारी घराकडे जात होती. यावेळी निखील वना सोनवणे याने त्याची मोटार सायकल रस्त्यात आडवी लावून म्हणाला कि, “तू माझी नाही झाली तर तुला मी कोणाचीच होवू देणार नाही” त्याने त्याच्या हातातील चाकूचा धाक दाखविला.तरुणीच्या हातातील फोन हिसकावून घेतला. त्यानंतर मोटार सायकलीवर बसवून शिवाजी नगर येथील त्याच्या मावशीच्या घरी नेवून तरुणीला एका खोलीत कोंडून ठेवले. १९ मेरोजी सकाळी तरुणीच्या राहत्या घराचे वॉलकंपाऊंडची भिंतीवरून उडी मारून हातात काचेची बाटली आणून पिडीत तरुणीच्या वडिलांना शिवीगाळ केली होती. पिडीत तरुणीच्या कुटुंबीयांना जीवे मारण्याची धमकी दिली.