अमळनेर पोलीस स्टेशनची कारवाई
अमळनेर (प्रतिनिधी) : धुळे येथून बाजारातून तीन बैल खरेदी करून त्यांना निर्दयीपणे छोट्या वाहनात कोंबून धरणगाव घेऊन जाणाऱ्या बैल मालक आणि वाहन चालक विरुद्ध अमळनेर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दि. १३ रोजी सकाळी साडे अकरा वाजेच्या सुमारास काही लोकांनी गुरांनी भरलेली गाडी अडवलेली होती. जितेंद्र निकुंभे व अमोल पाटील या गस्त घालणाऱ्या पोलिसांना गर्दी दिसल्याने त्यांनी चौकशी केली असता इकरार खान मुस्ताक खान (वय ३५ रा कसाई वाडा,धरणगाव) हा चालक बापू परभत धनगर याने धुळ्यातून विकत घेतलेले तीन बैल विना परवाना दाटीवाटीने कोंबून अमळनेर मार्गे धरणगाव घेऊन जात असल्याचे समजले.
बैलांना दाटीवाटीने कोंबून चारा पाणीची व्यवस्था न केल्याने पोलिसांनी प्राणी संरक्षण कायदा, मोटरवाहन कायदा आणि भारतीय न्याय संहिता नुसार वाहन चालक व बैल मालक यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वाहनासह तिन्ही बैल असा ३ लाख ५१ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून तपास हेडकॉन्स्टेबल विनोद सोनवणे करीत आहेत.