रावेर तालुक्यातील थोरगव्हाण येथील घटना
जळगाव (प्रतिनिधी) :- रावेर तालुक्यातील थोरगव्हाण येथील ६० वर्षीय इसमाला पोटात विळा लागल्याने आणि गटारीत पडून पायाला दुखापत झाल्याने उपचारासाठी जळगावात आणण्यात आले होते. उपचार सुरु असताना गुरुवारी रात्री त्याचा मृत्यू झाला आहे. याप्रकरणी शहर पोलीस स्टेशनला नोंद होऊन सावदा पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्याचे काम सुरु होते.
दिलीप सुका कोळी (वय ६०, रा. थोरगव्हाण, ता. रावेर) असे मयत इसमाचे नाव आहे. दि. ३० जानेवारी रोजी गावात असताना घरी त्याच्या पोटाला विळा लागला आणि तो गटारीत पडल्याने पायाला दुखापत झाली यावेळी कुटुंबीयांनी व ग्रामस्थांनी त्याला उपचारासाठी जळगावात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. तेथे उपचार सुरु असताना दि. १ फेब्रुवारी रोजी रात्री ८ वाजता त्यांचा मृत्यू झाला.
यावेळी कुटुंबीयांनी शोक व्यक्त केला. शहर पोलीस स्टेशनला नोंद होऊन सावदा पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्याचे काम सुरु होते.