जिल्हाप्रमुख भंगाळे यांनी दिले नियुक्तीपत्र
जळगाव (प्रतिनिधी) : तालुक्यातील शिरसोली येथील विकास पाटील यांची शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या जिल्हा उपसंघटकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. नियुक्ती बद्दल त्यांचे पक्षातील मान्यवरांकडून अभिनंदन करण्यात आले आहे.
जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे यांनी त्यांना नियुक्तीपत्र दिले आहे. नियुक्तीपत्र देताना जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे, संपर्कप्रमुख सचिन असबे, उपजिल्हाप्रमुख भाऊसाहेब सोनवणे, तालुकाप्रमुख उमेश पाटील तसेच शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते किरण बारी, सचिन चौधरी, विजय लाड, अविनाश पाटील आदी उपस्थित होते.