यावल तालुक्यात वीज चोरी करणाऱ्यांकडून होणार दंड वसूल
या तपासणीत आढळून आलेल्या संशयीत मीटरची वरिष्ठ पातळीवर तपासणी करण्यात येणार आहे. या तपासणीतून वीज चोरी झाल्याचे निष्पन्न झाल्यास, संबंधित ग्राहकांना वीज युनिट नुसार दंडाची नोटीस दिली जाणार आहे. महावितरणकडून विविध चोरी विरुद्ध धडक मोहीम राबवण्यात येत आहे. यावल तालुक्यातील सांगवी बुद्रुक गावात पथक पोहचून तपासणी केली असून, लवकरच इतर गावांमध्ये देखील कर्मचाऱ्यांच्या वतीने डिजिटल मीटर बसवून जुने मीटर काढण्यात येणार आहे. राज्य विद्युत वितरण कंपनीच्या वतीने ठिकठिकाणी तपासणी मोहीम राबविली जात आहे.