बोदवड तालुक्यातील वाकी शिवारात घटना
बोदवड ( प्रतिनिधी ) – वाकी शिवारामध्ये शेतातील विहिरीजवळ इलेक्ट्रीक खंब्यावरील लोखंडी बॉक्स उघडत असतांना विजेचा जबर धक्का बसल्याने एका तरूणाचा दुदैवी मृत्यू झाल्याची घटना सोमवारी २० ऑक्टोबर रोजी दुपारी ३ वाजता घडली आहे. याबाबत बोदवड पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.

जितेंद्र प्रल्हाद पाटील (वय ३० रा. वाकी ता. बोदवड )असे मयत तरूणाचे नाव आहे. जितेंद्र पाटील हा तरूण आपल्या कुटुंबियांसह बोदवड तालुक्यातील वाकी गावात वास्तव्याला होता. शेतीचे काम करत आपला उदरनिर्वाह करत होते. दरम्यान सोमवारी २० ऑक्टोबर रोजी दुपारी ३ वाजता शेतात गेलेला होता. त्यावेळी विहिरीत विद्यूत पंप चालू करण्यासाठी इलेक्ट्रीक खांबवरील लोखंडी पेटी उघडत असतांना त्याला अचानक विजेचा धक्का लागला. त्यामुळे त्याला तातडीने बोदवड येथील ग्रामीण रूग्णालयात दाखल करण्यात आले. यावेळी वैद्यकीय अधिकारी यांनी तपासणी केल्यानंतर मयत घोषीत केले. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. याप्रकरणी बोदवड पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोहेकॉ विनोद श्रीनाथ हे करीत आहे.









