भुसावळ तालुक्यातील वांजोळा येथील घटना
भुसावळ (प्रतिनिधी) :- तालुक्यातील वांजोळा येथे २७ वर्षीय महिलेचा विजेचा शॉक लागून मृत्यु झाल्याची घटना शुक्रवारी सकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास घडली आहे. याबाबत भुसावळ तालुका पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
दिपाली चेतन तायडे (वय २७) असे मयत तरुणीचे नाव आहे. दिपाली हिच्या पश्चात पती, एक मुलगी असा परिवार आहे. दीपाली हि घराजवळ पाण्याची मोटर लावण्यासाठी गेली असता विजेचा धक्का लागून जमिनीवर पडली होती. त्यावेळी तिला भुसावळ येथील खाजगी हॉस्पीटल मध्ये दाखल करण्यात आले. तेथील डॉक्टरांनी दिपाली यांना तपासून मृत घोषित केले. यानंतर मृतदेह ट्रॉमा केअर सेंटर येथे शवविच्छेदनासाठी दाखल करण्यात आला. यावेळी सासरच्या मंडळींवर दिपालीच्या माहेरच्या मंडळींनी पोलिसांकडे आक्षेप नोंदवले. याबाबत भुसावळ तालुका पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.