पाचोरा तालुक्यातील वेरुळी खुर्द येथील घटना
पाचोरा (प्रतिनिधी) :- स्वतःच्या शेतामध्ये पाणी भरत असताना विजेच्या मोटरचा धक्का लागून शेतकरी मृत्युमुखी पडल्याची घटना रविवारी उघडकीस आली. या प्रकरणी पाचोरा पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
तालुक्यातील वेरुळी खुर्द येथील शेतकरी भैया रमेश पाटील (वय ३९) हा त्याच्या शेतात गहू या पिकाला पाणी भरत असताना दि. १२ रोजी दुपारी २: ३०ते ३:०० वाजेच्या दरम्यान त्याला इलेक्ट्रिक शॉक लागल्याने जागीच दुर्दैवी मृत्यू झाला. त्याला पुढील उपचारासाठी पाचोरा ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याला मृत झाल्याचे घोषित केले. पाचोरा पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलीस निरीक्षक अशोक पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल मल्हार देशमुख हे करीत आहे. त्याच्या पश्चात आई, वडील व एक बहीण असून तो अविवाहित होता. माजी पोलीस पाटील रमेश दगडू पाटील यांचा तो मुलगा होत.