• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

ग्राहकांनी रूफटॉप सोलर बसवून वीजबिलात बचत करावी

महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक श्री. विजय सिंघल यांचे आवाहन

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
August 13, 2022
in खान्देश, जळगाव, भारत, महाराष्ट्र
0
ग्राहकांनी रूफटॉप सोलर बसवून वीजबिलात बचत करावी

जळगाव, (प्रतिनिधी ) – ‘भारत सरकारच्या नवीन व नवीकरणीय ऊर्जा मंत्रालय, महाराष्ट्र शासन व महावितरण यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यामध्ये रुफटॉप सोलर योजना राबविण्यात येत आहे. सदर योजने अंतर्गत ग्राहकांनी रुफटॉप सोलर आपल्या छतावर बसविल्यास ग्राहकांच्या वीजबिलात बचत होईल आणि या माध्यमातून ग्राहकांना उत्पन्न देखील मिळेल. याकरिता ग्राहकांनी जास्तीत जास्त प्रमाणात रुफटॉप सोलर या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक श्री.विजय सिंघल यांनी केले आहे.

महावितरणचे मुख्यालय असलेल्या प्रकाशगड येथे रूफटॉप सोलर वितरण एजन्सीच्या प्रतिनिधींची महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक श्री.विजय सिंघल यांनी ऑनलाईनद्वारे बैठक घेतली. या बैठकीस प्रकल्प विभागाचे संचालक श्री.प्रसाद रेशमे, प्रभारी मुख्य अभियंता श्री.चंद्रमणी मिश्रा यांच्यासह घरगुती रूफटॉप सोलर योजना राबविण्यासाठी निवड करण्यात आलेल्या एजन्सीचे प्रतिनिधी उपस्थित होते. या ऑनलाईन बैठकीस सुमारे १६० एजन्सी प्रतिनिधी उपस्थित होते.

यावेळी श्री. सिंघल म्हणाले की, केंद्र शासनातर्फे राबविण्यात येणाऱ्या या योजनेत घरगुती ग्राहक आणि गृहनिर्माण संस्थाना रूफ टॉप बसविण्याकरिता अनुदान देण्यात येत आहे. यात घरगुती ग्राहकांना १ ते ३ कि.वॅ. क्षमतेपर्यंत प्रकल्प खर्चाच्या प्रमाणात ४० टक्के तसेच ३ कि.वॅ. चे वर ते १० कि. वॅ. पर्यंत खर्चाच्या प्रमाणात २० टक्के अनूदान देण्यात येत आहे. याशिवाय गृहनिर्माण संस्था व निवासी कल्याणकारी संघटना करिता १ कि.वॅ. ते ५०० कि. वॅट करिता प्रकल्प खर्चाच्या प्रमाणात २० टक्के अनुदान देण्यात येत आहे. या योजनेअंतर्गत एकूण प्रकल्प खर्चापैकी अनुदानाची रक्कम वगळता उर्वरित रक्कम ग्राहकांनी निवडलेल्या संबंधित एजन्सीला द्यायची आहे.

पुढे श्री.सिंघल म्हणाले, ‘रूफटॉप सोलर बसविण्यामध्ये महाराष्ट्राचा देशात प्रथम क्रमांक येण्यासाठी सर्वांनी एकत्रितपणे प्रयत्न करण्याची गरज आहे. एजन्सीने जास्तीजास्त ग्राहकांकडे रूफटॉप सोलर बसविण्यासाठी प्रयत्न करावेत. अनुदान प्रक्रियेत कागदपत्रांच्या त्रुटींसंदर्भात कर्मचारी व एजन्सी प्रतिनिधी यांना मार्गदर्शन करून अनुदान प्रक्रिया अधिक गतिमान करावी. याकरिता एजन्सीना क्षेत्रीय स्तरावरावर येणाऱ्या अडचणींचे निवारण करण्यासाठी नोडल अधिकाऱ्याची नेमणूक करण्यात यावी असे निर्देश श्री.सिंघल यांनी दिले.

यावेळी एजन्सी प्रतिनिधींना क्षेत्रीय स्तरावर काम करताना येणाऱ्या अडचणी व शंकांचे निरसन संचालक(प्रकल्प) श्री.प्रसाद रेशमे यांनी केले. यावेळी रूफटॉप संबंधित सर्व परिपत्रके वेबसाईटवर उपलब्ध करून देण्याबाबत निर्णय घेण्यात आला. याचबरोबर एजन्सीच्या प्रतिनिधींचा व्हॉट्सअॅप ग्रुप तयार करण्यात येणार आहे. या बैठकीत करण्यात आलेल्या मार्गदर्शनाबाबत एजन्सी प्रतिनिधींनी समाधान व्यक्त केले.


 

 

Tags: # vijay sighal mahavitarn news #jalgaon #maharashtra #bharat
Previous Post

भोजपुरी गायकाकडे सापडला २१ किलो गांजा

Next Post

दहिगाव येथे ११ वर्षीय विद्यार्थ्याने घेतला गळफास

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

दहिगाव येथे ११ वर्षीय विद्यार्थ्याने घेतला गळफास

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

गावठी कट्टा व जिवंत काडतुसासह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद
1xbet russia

गावठी कट्टा व जिवंत काडतुसासह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद

March 30, 2026
“मणक्याचे आजार : निदान, उपचार, शस्त्रक्रिया” विशेष शिबिराचे मंगळवारी आयोजन
1xbet russia

जळगाव शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात आता ‘झिरो पेंडन्सी’ कारभार

March 30, 2026
दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी ५३ लक्ष किमतीचे कर्णयंत्र वितरण
1xbet russia

दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी ५३ लक्ष किमतीचे कर्णयंत्र वितरण

March 30, 2026
शिवशक्ती विराट हिंदू संमेलनात हिंदू एकतेचा संदेश
1xbet russia

हिंदू धर्म केवळ एक धर्म नाही जीवन जगण्याची पद्धत आहे — ह.भ.प  विलास सायगावकर

March 30, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

गावठी कट्टा व जिवंत काडतुसासह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद

गावठी कट्टा व जिवंत काडतुसासह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद

March 30, 2026
“मणक्याचे आजार : निदान, उपचार, शस्त्रक्रिया” विशेष शिबिराचे मंगळवारी आयोजन

जळगाव शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात आता ‘झिरो पेंडन्सी’ कारभार

March 30, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon