जामनेर (प्रतिनिधी ) – येथील युवा कवी साहित्यिक लेखक कलावंत विजय सुर्यवंशी यांना २०२१ – २२ चा शिवचरण उज्जेनकर फाऊंडेशन मुक्ताईनगरचा राज्यस्तरीय तापी – पुर्णा समाजसेवा पुरस्कार जाहीर झाला आहे.
विजय सुर्यवंशी हे बेटी बचाव, स्वच्छता अभियान, मतदान जनजागृती, लसीकरण, कोरोना जनजागृती, लोकसंख्या, साक्षरता, शिक्षण, आरोग्य, हुंडाबळी, घनकचरा व्यवस्थापन, व्यसनमुक्ती अशा विविध सामाजिक विषयांवर लोकनाट्य / पथनाट्याच्या माध्यमातून समाजप्रबोधन जनजागृती करीत आहेत. तसेच ते उत्कृष्ट साहित्यिक देखील असून त्यांच्या आकाशवाणी केंद्रावरून वेळोवेळी कविता ही प्रकाशित होत असतात. निबंध, कथा, कविता, वैचारिक लेख त्यांचे विविध नियतकालिक, दिवाळी अंकाच्या माध्यमातून प्रकाशित होत असतात. वेळोवेळी रक्तदान ही ते करत असतात.
त्यांच्या या सामाजिक कार्याची दखल घेऊन अनेक संस्थांनी त्यांचा विविध पुरस्कारांनी गौरव देखील केला आहे. त्यांच्या या यशाबद्दल प्राचार्य डाॅ. शिरीष पाटील सर, प्रा.अक्षय घोरपडे सर, संतोष सराफ, रविंद्र झाल्टे, रूपेश बिऱ्हाडे, यांच्यासह मित्र परिवारातून कौतुक होत आहे.