चाळीसगाव (प्रतिनिधी ) – बोढरे येथील १७ वर्षीय तरूणाचा विहीरीत बुडून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना दुपारी आली पंचनामा करण्यात आला.
बोढरे येथील अनिल शिवाजी राठोड (वय-१७) या तरूणाचा शिवारातील विहीरीत बुडून मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी उघडकीला आली या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला . अनिल राठोडचा मृतदेह शवविच्छेदनासाठी चाळीसगाव ग्रामीण रूग्णालयात नेण्यात आला .
अगोदरच घरात हलाखीची परिस्थिती असल्याने आई-वडील ऊसतोडीचे कामे करून उदरनिर्वाह करीत आहेत. मात्र काळाने त्यांच्यावर घाला घातल्याने सर्व स्तरातून हळहळ व्यक्त होत आहे.