गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजनेचे श्रमसंस्कार शिबिर उत्साहात
जळगाव — राष्ट्रीय सेवा योजना अंतर्गत गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालय, जळगाव आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्र शिक्षण विद्यापीठ, लोणेरे यांच्या संयुक्त विद्यमाने विशेष हिवाळी श्रमसंस्कार शिबिर बेळी (ता. जि. जळगाव) येथे उत्साहात संपन्न झाले.
या शिबिराचा मुख्य उद्देश विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक बांधिलकी निर्माण करणे व समाजोपयोगी कार्यात त्यांना सक्रिय सहभागी करून घेणे हा होता.शिबिरात स्वयंसेवकांनी गावभर डिजिटल लिटरसी संबंधित दिंडी काढून पर्यावरण संवर्धनाचा संदेश दिला. वृक्षदिंडीच्या माध्यमातून झाडांना आळी तयार करून त्यांचे संरक्षण करण्यात आले तसेच नवीन झाडांचे वृक्षारोपण करून पर्यावरण संरक्षणाचा वसा घेतला.गावातील सार्वजनिक ठिकाणे आणि रस्त्यांची स्वच्छता मोहीम राबवली. मार्गदर्शन सत्रात मुक्ताईनगरचे प्राचार्य डॉ. एच. ए. महाजन, उपप्राचार्य डॉ. ए. एम. पाटील, डॉ. व्ही. डी. चौधरी, डॉ. अतुल बर्हाटे, प्रा. पवन भंगाळे, प्रा. सूरज चौधरी आदी मान्यवरांनी उपस्थित विद्यार्थ्यांना राष्ट्रप्रेम, समाजसेवा आणि राष्ट्रीय सेवा योजनेचे महत्त्व पटवून दिले. यशस्वी आयोजनासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विजयकुमार पाटील, डॉ. हेमंत इंगळे(अधिष्ठाता), विभागीय प्रमुख आणि कार्यक्रम अधिकारी डॉ. अनिल कुमार डी. विश्वकर्मा, प्रा. श्रद्धा वारके यांनी मोलाचे योगदान दिले. स्वयंसेवक आणि मार्गदर्शकांचे गोदावरी फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. उल्हास पाटील, डॉ. वर्षा पाटील (सचिव), डॉ. केतकी पाटील(सदस्य), डॉ. अनिकेत पाटील सर यांनी अभिनंदन व कौतुक केले.