जळगाव ( प्रतिनिधी ) – कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील अनागोंदी संपवून सगळा कारभार मार्गावर आणा अन्यथा आंदोलन करू असा इशारा मनसेने कुलगुरूंना दिलेल्या निवेदनात दिला आहे

या निवेदनात पुढे म्हंटले आहे की , २ वर्षांपासून या विद्यापीठातील अनेक गैरव्यवहारांबद्दल वर्तमानपत्रांमधून बातम्या प्रसिद्ध झाल्या आहेत . त्यामुळे विद्यापीठाची प्रतिमा आधीच मलीन झाली आहे सरकारच्या आणि विद्यापीठ राक्षसानाच्या पातळीवरून याची काहीच दखल घेतली जात नाही दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई झाली नाही .
कोरोनामुळे विद्यार्थी त्रस्त असताना आता कर्मचाऱ्यांनी लेखणी बंद आंदोलन सुरु केले आहे विद्यापीठ आपल्याच कर्मचाऱ्यांच्या मागण्या पूर्ण करीत नसेल तर विद्यापीठाला विद्यापीठ कायद्याचा विसर पडला आहे की काय ? असे बोलले जात आहे . या सगळ्या परिस्थितीची गंभीर दखल न घेतल्यास आंदोलन उभारू असा इशारा मनसेने दिला आहे .
या निवेदनावर जनहित कक्ष जिल्हाध्यक्ष विरेश पाटील , उप जिल्हाध्यक्ष अविनाश पाटील व रज्जाक सय्यद , महानगराध्यक्ष संदीप मांडोळे , उप महानगराध्यक्ष इमाम पिंजारी , अन्वर भिस्ती यांचं सह्या आहेत.







