• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

विद्याधर गीत रंगात रसिक चिंब

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
October 8, 2023
in Uncategorized
0

जळगाव ( प्रतिनिधी ) – भवरलाल अँड कांताबाई जैन फाऊंडेशनच्या  सहकार्याने प्रख्यात संगीत नाटककार विद्याधर गोखले यांच्या जन्मशताब्दी निमित्ताने जळगावच्या स्व. वसंतराव चांदोरकर स्मृती प्रतिष्ठान व मुंबईच्या विद्याधर गोखले नाट्य संगीत प्रतिष्ठान या दोन्ही संस्थांच्या संयुक्त विद्यमाने विद्याधर गीतरंग या कार्यक्रमाचे आयोजन कांताई सभागृहात करण्यात आले होते.


कार्यक्रमाची सुरुवात प्रतिष्ठानच्या परंपरेनुसार गुरुवंदनेने झाली. गुरुवंदना प्रतिष्ठानचे कार्यकारी विश्वस्त दीपक चांदोरकर यांनी सादर केली. कार्यक्रमाचे उद्घाटन व दीप प्रज्वलन जळगाव जिल्ह्याचे प्रांत श्री. महेश सुधळकर, अनुभूती स्कूलच्या संचालिका सौ. निशा जैन, डॉ. राजेंद्र फडके व उद्योजक श्री. किरण बेंडाळे यांच्याहस्ते झाले.  मान्यवरांचे स्वागत प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. विवेकानंद कुलकर्णी, डाॕ. राजेंद्र फडके, प्रतिष्ठानचे कार्यकारी विश्वस्त दीपक चांदोरकर यांनी केले. तर कलावंतांचे स्वागत प्रतिष्ठानच्या उपाध्यक्ष सौ. दीपिका चांदोरकर,प्रा. शरद चापेकर यांनी केले. या कार्यक्रमात ज्ञानेश पेंढारकर, नीलाक्षी पेंढारकर,  प्राजक्ता जोशी व निमिश कैकाडी यांचा सहभाग होता. तर साथसंगत धनंजय पुराणिक (तबला) व वरद सोहनी (ऑर्गन) यांनी केली. कार्यक्रमाची संकल्पना व निवेदन सौ. शुभदा दादरकर यांचे होते, आणि सुरू झाला नाट्यपदांचा एक अविरत झरा.
कार्यक्रमाची सुरुवात “सप्तसूर झंकारती बोले” या जय जय गौरीशंकर नाटकातील नांदी ने झाली. त्यानंतर ज्ञानेश पेंढारकरांनी जय जय गौरीशंकर नाटकातील “रमा रमण श्रीरंग” हे वसंत देसाई यांनी संगीतबद्ध केलेले पद गायले त्यानंतर पंडित राज जगन्नाथ नाटकातील “मदनाची मंजिरी साजिरी” हे नाट्यपद सादर केले संगीतभूषण पं. राम मराठे यांनी संगीतबद्ध केलेले मंदार माला नाटकातील “कोण असशील तू न कळे” हे पद सादर केले त्यानंतर सौ. नीलाक्षी पेंढारकर यांनी पं. राम मराठे यांनी संगीतबद्ध केलेले मंदार माला नाटकातील “सोहम हर डमरू बाजे” तसेच मदनाची मंजिरी नाटकातील प्रभाकर भालेकरांनी संगीतबद्ध केलेले “अंग अंग तव अनंग” व “ये मौसम है रंगीत” या नाट्यपदाने तर कहरच केला. त्यानंतर मैफिलीमध्ये आला नवा दमाचा गायक निमिश कैकाडी निमिशने पंडितराज जगन्नाथ नाटकातील गाजलेलं पद “सावन घन गरजे” गरजे हे नाट्यपद सादर करून रसिकांची वाहवा मिळवली. त्याच नाटकातील “जय गंगे भागीरथी” या नाट्यपदाने तर कमालच केली.  त्यानंतर शाब्बास बिरबल शाब्बास या नाटकातील “जय जय कुंजबिहारी” नाट्यगीत सादर केले अशीच एक तरुण आश्वासक गायिका म्हणजे प्राजक्ता जोशी छोटा गंधर्वांनी संगीतबद्ध केलेल्या सुवर्ण तुला नाटकातील “कोण ही सुंदरा” हे नाट्यपद प्राजक्ताने सादर करून रसिकांना मंत्रमुग्ध केले त्यानंतर जय जय गौरीशंकर नाटकामधील “नारायणा रमा रमणा” हे अत्यंत गाजलेलं नाट्यपद अत्यंत ताकतीने प्राजक्ताने सादर केले आणि रसिकांचे कान तृप्त केले मदनाची मंजिरी नाटकातील “ऋतुराज आज वनी आला” या नाट्यपदाने या विद्याधर गीतरंग रजनी ने कळसच गाठला. या सर्व गायकांमध्ये आपल्या जळगावचे एक अत्यंत हरहुन्नरी असे कलाकार डॉ. राजेंद्र फडके यांनी उत्स्फूर्तपणे एक नाट्यपद सादर करण्याची विनंती केल्याने त्यांनाही या निमित्ताने व्यासपीठाची सेवा करण्याचा योग आला.  त्यांनी  “रती हुनी सुंदर मदनमंजिरी”  “हरे मनात सुंदरा तुझीच मूर्ती शामला” ही दोन नाट्यपदे सादर करून मैफिलीत रंग भरले. ही नाट्यपद सादर करून डॉकटर मधला कलाकार तमाम जळगावकर रसिकांना दाखवून दिला. विद्याधर गीतरंग या कार्यक्रमाची सांगता बावनखणी नाटकातील पंडित यशवंत देवांनी संगीतबद्ध केलेली रचना सर्व कलावंतांनी मिळून सामूहिक रित्या गायली आणि ती रचना होती “होलीकोत्सव गीताची”. या गीताने विद्याधर गीत रंग सांगता झाली. संपूर्ण कार्यक्रमास तितकीच दमदार साथ धनंजय पुराणिक व तरुण आश्वासक कलावंत वरद सोहनी यांनी केली कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन दीपक चांदोरकर यांनी तर सूत्रसंचालन सौ दीपिका चांदोरकर यांनी केले.


 

 

Tags: #bhavarlal and kantai foundetion news #jain erighttps://kesariraj.com/vidyadhar-git-rangat-rasik-chimb/
Previous Post

खळबळजनक ! महाविद्यालयीन तरुणीवर बलात्कार, पॉक्सोअंतर्गत गुन्हा दाखल

Next Post

धावत्या रेल्वेत पतीसमोरच पत्नीचा हृदयविकाराने मृत्यू

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

धावत्या रेल्वेत पतीसमोरच पत्नीचा हृदयविकाराने मृत्यू

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

भुसावळ हादरले ! चाकू हल्ल्यात १३ वर्षीय मुलासह तरुण जखमी
1xbet russia

भुसावळ हादरले ! चाकू हल्ल्यात १३ वर्षीय मुलासह तरुण जखमी

February 12, 2026
भुसावळ विभागाचा ‘सुरक्षा कुंपण’ उपक्रम प्रवाशांसाठी ठरणार वरदान!
1xbet russia

भुसावळ विभागाचा ‘सुरक्षा कुंपण’ उपक्रम प्रवाशांसाठी ठरणार वरदान!

February 12, 2026
दुचाकींची समोरासमोर भीषण धडक ; प्रौढाचा उपचारादरम्यान ठार
1xbet russia

भरधाव ट्रॅक्टरच्या धडकेने उत्राणच्या शेतमजुराचा मृत्यू

February 12, 2026
कंपनीच्या गोडावूनमधून अज्ञात चोरट्यांकडून रोकडची चोरी
1xbet russia

खडकी बायपास परिसरात दीड लाखांची रोकड लंपास

February 12, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

भुसावळ हादरले ! चाकू हल्ल्यात १३ वर्षीय मुलासह तरुण जखमी

भुसावळ हादरले ! चाकू हल्ल्यात १३ वर्षीय मुलासह तरुण जखमी

February 12, 2026
भुसावळ विभागाचा ‘सुरक्षा कुंपण’ उपक्रम प्रवाशांसाठी ठरणार वरदान!

भुसावळ विभागाचा ‘सुरक्षा कुंपण’ उपक्रम प्रवाशांसाठी ठरणार वरदान!

February 12, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon