जळगावात परप्रांतीय तरुणीच्या फिर्यादीवरून तरुणाला अटक
राहुल योगराज पाटील (वय-२६, रा. आयोध्या नगर, जळगाव) असे अटक केलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे. अयोध्या नगर परिसरातील एका भागात परप्रांतीय २२ वर्षीय तरुणी ही कुटुंबासह वास्तव्याला आहे. दरम्यान दि. १ जानेवारी २०२४ रोजी तरुणी आंघोळ करत असताना संशयित आरोपी राहुल योगराज पाटील (वय २६) याने नकळत तिचे फोटो आणि व्हिडिओ काढले. त्यानंतर त्याने फोटो आणि व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देऊन तिच्यावर वेळोवेळी अत्याचार केला. त्यानुसार संशियत आरोपी राहूल पाटील याच्या विरोधात एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी त्याला अटक केली आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक माधुरी बोरसे हे करीत आहे.